Ticker

6/recent/ticker-posts

ललगुण शाळेत बालबाजार उत्साहात संपन्न



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

ललगुण ता . खटाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बाल बाजाराचे व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सौ.पूजा विजय भोसले, माजी सरपंच श्री. जयवंत गोसावी, सौ.रोहिणी कैलास घाडगे, श्री.बबन दादा घाडगे, श्री.प्रताप दादा घाडगे, ललगुण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.नितीन खोत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अनिल काटकर, उपाध्यक्ष सौ.मीनाक्षी अजित घाडगे, सर्व सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पालेभाजी,खाऊ गल्लीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी  वेगवेगळे पदार्थांची आकर्षक मांडणी केली होती. सकाळी साडेनऊ ते साडेबारा या तीन तासांमध्ये सुमारे 40 हजार रुपयांची उलढाल या छोट्याशा बाजारात झालेली आढळली.  सातवीतील  विद्यार्थिनींनी तयार केलेले  हॉटेल हे या बाल बाजाराचे वैशिष्ट्य ठरले. सुमारे एक हजार आठशे रुपयांची विक्री या मुलींनी केली. सुमारे 200 महिलांनी हळदीकुंकू समारंभात सहभाग घेतला.     

     विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक विश्वास चौधरी,  उपशिक्षक श्री.सुनील मदने , श्री पोपट तानाजी गोफणे,सौ. संध्या निलेश गावित, सौ. शुभांगी उत्तम पवार, श्री. कमलेश रोहिदास पाटील श्रीम.विजया माळी, कु. पूजा शिरतोडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.