Ticker

6/recent/ticker-posts

दिंडोरीत भाजपचा जल्लोष



           दिंडोरी । दि. 8 प्रतिनिधी

दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपची सत्ता आल्याने दिंडोरी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्याची आतशबाजी करुन पेढे वाटप करण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

दिल्लीमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपला यश येत नव्हते. परंतू या विधानसभा निवडणूकीत भाजपने 48 जागावर बाजी मारत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. या निवडणूकीचे पडसाद दिंडोरी तालुक्यात येताच दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्याची आतशबाजी करुन पेढे वाटप करण्यात आले व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो ’आदींसह विविध घोषणा देण्यात आल्या.   तालुकाध्यक्ष शाम मुरकूटे, शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे, संयोजक रणजित देशमुख, डॉ. राजेंद्र वराडे, सरचिटणीस मित्रानंद जाधव, विलास देशमुख, अमोल खोंडे, नीलेश खोंडे, संपत पिंगळ, शांताराम जाधव, रमेश क्षिरसागर, गोविंद बोडके, दिंगबर ढाकणे, संजय कदम, धीरज चव्हाण, सचिन दहिकर, प्रकाश माळी, शशीकांत विधाते, कचरु शिंदे, अशोक जाधव, निता भामरे, अनुष्का गांगुर्डे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिंडोरीचे पोलिस हवालदार कृष्णा भोये, झोटींग, कातकाडे आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.