संदिप गावडे @ शहर प्रतिनिधी
आष्टा, दि. ८ फेब्रुवारी २५
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांची पक्षाच्या कार्यकारणी सदस्य पदी निवड केली. याबाबत सांगली जिल्हा कार्यालय मध्ये झालेल्या जिल्हा व तालुका कार्यकारणी बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष देवराज पाटील बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वैभव शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
या निवडीबाबत देवराज पाटील म्हणाले, वैभव शिंदे यांना अनेक वर्ष वेगवेगळ्या संघटनेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष संघटना बळकटीसाठी निश्चित होईल.
यावेळी वैभव दादा शिंदे म्हणाले, शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून पक्ष बांधणी बळकट करू. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिलेल्या संधीचा फायदा संघटना मजबूत करण्यासाठी करेन. तसेच स्व. विलासराव शिंदे साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन भविष्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची कामगिरी चांगली करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अनिता सगरे, सुस्मिता जाधव, कमल पाटील ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनुरकर, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील,अमोल शिंदे, दिलीपराव वग्याणी, टि.व्ही पाटील, विश्वासतात्या पाटील, राजू पाटील आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
\





Social Plugin