सिंदखेडराजा :- शिवउद्धान राहेरी बु येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु. येथे १८ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यातआले होते. या रक्तदान शिबरामध्ये ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. सदरील कार्यक्रमाचे आयोजन जगदंब प्रतिष्ठान, समस्त गावकरी मंडळी, ग्रामपंचायत तथा शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले होते.
तर या रक्तदान शिबिरासाठी जिजामाता हॉस्पिटल व महिला आरोग्य केंद्र सिंदखेडराजा यांचे विशेष सहकार्य लाभले असून रक्त संकलन हे जालना ब्लड बँक चे वतीने करण्यात आले.
.jpg)




Social Plugin