Ticker

6/recent/ticker-posts

पुणे येथिल NAWPC चे राहुल देशमुख अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित



यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर ग्रामीण प्रतिनिथी

पुणे येथिल नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड्( NAWPC ) पुणे या संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख व देवता देशमुख यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा अटल शक्ती पुरस्कार 29 जानेवारी रोजी दिवशी  टिळक स्मारक मंदिर येथे प्रदान करण्यात आला.पुरस्काराचे स्वरूप ( रुपये ५१,०००/,   सन्मान पत्र, सन्मान चिन्ह, शाल , श्रीफळ ) असे होते.  हा पुरस्कार डॉ. चेतनानंदजी उर्फ पंकज महाराज गावडे तसेच महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी बोलतांनापंकज महाराज गावडे म्हणाले की,"एक ना एक दिवस या राहुल देशमुखचं नाव देशाच्या मुखात नक्की असेल.”

     प्रमुख पाहुणे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल देशमुख यांच्या कार्याची तसेच नेत्रहीन व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी  जी धडपड घेतली आहे त्याचे भरभरून कौतुक केलं! गौरव केला.सुरवातीला व्यासपीठावर   दीपप्रज्वलन व  अटलजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आला नंतर नगरसेवक मा. दिलीप काळोखे यांनी प्रास्ताविक केले, 

       या वेळी सत्कार मूर्ती राहुल देशमुख यांनी संस्थेचे कार्य विषद करतांना आपली लाईफ हिस्ट्री सांगत असतांना प्रेक्षकांना आपले अश्रु अनावर झाले होते.  आजवर राहुल देशमुख यांना स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील 35 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.या पुरस्कारा बद्दल श्याम दंडवते (साकुरी ) डॉ. यशवंत पवार (अध्यक्ष, जयकाली सांस्कृतिक मंडळ कन्नड ) सचिन पवार (अध्यक्ष ,कृष्णा इंटरनॅशनल स्कूल कन्नड ) अजय बाविस्कर ( नागपूर ) विजया नवले (संगमनेर ) वसंतराव देशमुख (गणेशनगर )संगीता जगधणे ( श्रीरामपूर )सविता जगताप (जळगाव ) रमेश देशमुख (श्रीरामपूर )नंदा डमरे (लासलगाव) वसुधा देशमुख  (बाभळेश्वर) हिरा सुपेकर (नाशिक)

    यांनी राहुल देशमुख आणि देवता देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.