गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
कारंजा शहरातील दारव्हा वेश परिसरातील फजल अॅटोडील तसेच स्पेअर पार्टच्या दुकानात दिनांक ६/२/२०२५ला रात्री अंदाजे साडे अकराच्या सुमारास दुकानाला आग लागली, हि माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सदर जागेवर धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, त्यानंतर कारंजा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले, अग्निशमन दलाचे जवान व नागरिकांच्या मेहनतीने आग आटोक्यात आणली, सदर आगीने उग्र रूप धारण केले होते, दुकानातान दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात होते तसेच नवीन बॅट-या जळत असतांनी मोठ्या प्रमाणात आवाज येत होता,
दोन्ही दुकानातील साहीत्य जाळुन खाक आहेत, आग कशामुळे लागली कळु शकले नाही, दहा लाखा पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती दुकानाचे मालक मुन्ना पठाण यांनी दिली आहे, शासना तर्फे मदत मिळावी अशी मागणी संबंधित दुकान मालकाने केली आहे, काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कीसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार तसेच कारंजा शहर अध्यक्ष आमीर पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली आहेत





Social Plugin