आष्टा / प्रतिनिधी
येथील सुभद्रा इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'युफोरिया 2025' हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आष्ट्याचे अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे तसेच अश्फाक चौगुले साहेब उपस्थित होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रो. आर. ए. कनाई सर, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी रजिस्टार संतोष मोहिते, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेश सरलया सर, स्कूलचे मॅनेजर सुमसिन कनाई सर, प्राचार्य अखिल मॅथ्यू, उपप्राचार्या सौ. सिमी डॉमिनिक मॅम आदी प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने व आपले आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणेशाच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच या कार्यक्रमांतर्गत संगीत, नृत्य, नाटक यांचा समावेश होता. विविध गाणी, रंगबिरंगी वेशभूषा, कला यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य, मेहनत आणि सर्जनशीलता तसेच त्यांच्या अंगी असणारे विविध गुणदर्शन दिसून आले. त्यामुळे या नेत्रदिपक सोहळ्याने शाळेचा परिसर दाणाणून सोडला. हा कार्यक्रम अविस्मरणीय अनुभव होता, असे गौरवोदगार प्रमुख पाहुण्यांनी काढले.
या स्नेहसंमेलनासाठी सांस्कृतिक विभाग,कला विभाग, संगीत विभाग या विभागातील शिक्षकांचे योगदान तसेच पालकांचे प्रोत्साहन ही विद्यार्थ्यांची प्रेरणा होती. याचे संयोजन शाळेचे नृत्य शिक्षक अमोल सर, सुशील सर व त्यांची टीम यांनी केले. तर शाळेचे मॅनेजर, प्राचार्य, उपप्राचार्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. श्रुती सन्नी व रीफा मुजावर यांनी केले.





Social Plugin