बंडु शिंगटे/घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामस्थांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ८७ लाभार्थींना घरकुल मंजूर झाले आहेत. ग्राम विस्तार अधिकारी कैलास कल्याणकर, सरपंच भरत काळे, उपसरपंच कृष्णा सिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल मस्के पाटील, विशाल पवार, ज्ञानेश्वर मस्के, यांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राम विस्तार अधिकारी कैलास कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ९३ पैकी ८७ घरकुल पात्र लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आली आहे. त्यातील पहिले हप्त्याचे पैसेही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे असे कल्याणकर यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अशोक दोबाले, संतोष खापरे, बबन बिरले, गणेश पांचाळ, शिवसिंग पवार,आदी ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin