Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक प्रोजेक्ट मध्ये 30 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करून घ्या- ग्राम महसूल अधिकारी पी. एम. काळे (तलाठी )



 बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                                                                                 

    बिलोली तालुक्यातील मौजे अटकळी येथे ग्राम महसूल अधिकारी पी.एम. काळे मॅडम (तलाठी) यांनी स्वतः सी.एस.सी. केंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांना 30 मार्च 2025 पूर्वी ॲग्री स्टॅक प्रोजेक्टमध्ये  नोंदणी करून घेण्यासाठी आव्हान केले. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी निष्काळजीपणा करू नये. ॲग्री स्टॅक प्रोजेक्टमध्ये नोंदणीसाठी दुर्लक्ष केलात तर शेतीच्या सर्व लाभांपासून वंचित राहावे लागणार. ॲग्री स्टॅक प्रोजेक्टमध्ये नोंदणी करून शासकीय विभागाला सहकार्य करावे. गावातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक प्रोजेक्टमध्ये नोंदणी करतील अशी अपेक्षा करत शेतकऱ्यांना ते बोलत होते.