देगलूर - प्रतिनिधी -
शहापुर सब पोस्ट ऑफिस अंतर्गत असलेल्या आलुर शाखेचे ब्रांच पोस्ट मास्तर माणिकराव पाटील यांचा सेवानिवृत्त गौरव सोहळा कार्यक्रम देगलुर डिव्हिजनचे कर्तव्यदक्ष आयपी भागवत जी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिडिएस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.स्वामी साहेब,डाक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा गंगाधर भिलवंडे साहेब, संघटनेचे सचिव काळे, संघटनेचे रामेश्वर पांचाळ, शहापुर एस ओ चे एसपिएम मा बालाजी यलपलवाड सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहापुर एस ओ अंतर्गत नरंगल,तमलुर,शेळगाव,वन्नाळी,सुगाव,नंदुर या शाखेतील बिपिएम, एबिपिएम, डाक सेवक यांच्या पुढाकाराने सेवानिवृत्त गौरव सोहळा पार पडले.
यावेळी मा मुंडे साहेब,स्वामी साहेब,भिलवंडे,दवणे सर,यलपलवाड सर,पांचाळ यांनी माणिकराव पाटील यांना मनोगत व्यक्त करुन भरभरून शुभेच्छा दिल्या.
वन्नाळीचे एबिपिएम सचिन टेंगेटोल यांची मुंबई एअरपोर्ट येथे एम टिएस पदी पदोन्नती झाल्याबद्दल अभिनंदन केले.





Social Plugin