भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
दरवर्षी 09 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन. म्हणून साजरा केला जातो. जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करणे आणि पर्यावरण रक्षणातील त्यांच्या योगदानाची दखल घेणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या दिवशी विविध ठिकाणी भव्य मिरवणुका (रॅली), पारंपरिक नृत्य (उदा. तारपा नृत्य), लोककला सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.समाजाचे नेते, तरुण आणि नागरिक एकत्र येऊन बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,शाहू,फुले, यांसारख्या थोर महापुरुषांना व नायकांना अभिवादन करतात.
जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जातो.आज दिनांक 09/08/2026 भुरभुशी येथे सुद्धा आज चा दिवस खूप आनंदात साजरा केला जात आहे...





Social Plugin