(अशोक पाटील@ग्रामीण पत्रकार) शहादा दिनांक ११/८/२०२६
पंचकृष्ण लॉन्स नाशिक येथे श्री चक्रधर स्वामी यांची महानुभाव पंथी यांच्या भक्तीचा महासागर प्रसादसेवा पर्व एका छताखाली 35 कुलवंदन व प्रसाद सेवा आचार्य डोळसकर बाबाजी, करंजगांव नाशिक. बाबांच्या आयोजनातून नाशिक जिल्हा निवासी संत महंत यांच्या प्रसन्नतेने, मार्गदशनाने व नाशिक जिल्हा वासनिक, सदभक्त यांच्या सहकार्यातून उत्साहात साजरा करण्यात आला. जवळपास ठाणे पुणे मुंबई पालघर नागपूर नंदुरबार शहादा शिरपूर जळगाव अमरावती बुलढाणा अकोला अहिल्यनगर तसेच पूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील संत महंत वासनिक सगळ्यांनी या देव पूजेच्या लाभ घेतला सकाळी दहा वाजेपासून देवपूजेला सुरुवात झाली तर पहाटे अडीच वाजेपर्यंत सगळे भाविक भक्तांच्या रांगा च रांगा लागलेल्या होत्या. श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिस्तीच्या व जातीभेद नष्ट करून आम्ही सगळे महानुभाव आहोत हे सिद्ध करत १२ ते १३ तास एकाच रांगेत उभे राहून कासवाच्या गतीने हळूहळू पुढे सरकत व शिस्तीत सगळे संत महंत वासनिक मंडळी सगळ्यांनी अगदी शांततेत देवपूजा प्रसाद वंदनाचा लाभ घेतला





Social Plugin