Ticker

6/recent/ticker-posts

वनपरिक्षेत्र मालेगाव वन विभाग वाशिम यांच्याकडून सतर्कतेचा इशारा



*मेडशी परिसरात मादी बिबट्याचा तीन बछड्यासह मुक्त संचार*


मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

 मेडशी हे गाव चारही बाजूने घनदाट जंगल व डोंगराळ भागाने व्यापलेल्या आहे.या परिसरामधील मेडशी ते मालेगाव या जुन्या महामार्गातील उर्ध्व मोर्णा प्रकल्प जवळील पावर हाऊस मोर्णा नदीवरील पुलाखाली आठ ते दहा दिवसापासून मादी बिबट्याचा तीन बछडयासह मुक्त संचार असल्याची सगळीकडे चर्चा असताना. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पण मेडशी परिसरातील नागरिक व शेतकरी तसेच आजूबाजूच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रवासी व ग्रामस्थांना सतर्कतेच्या दृष्टिकोनातून

 वनपरिक्षेत्र मालेगाव,वन विभाग वाशिम,यांच्याकडून मेडशी पावर हाऊस जवळील मोर्णा पुलाखाली बिबट्याचा पिल्ल्यासोबत वावर असल्यामुळे मेडशी परिसर व जवळील गावखेडा परिसरातील नागरिकांनी मोर्णा नदी पुलाच्या जवळपासच्या क्षेत्रात रात्री- बेरात्री कुणीही एकट्याने फिरू नये असे सूचना फलका द्वारा सतर्कतेच्या दृष्टिकोनातून अहवान करण्यात आले आहे