केतन खिलारे माळशिरस तालुका प्रतिनिधी
खासदार निधी व आमदार निधीतून केलेल्या विकास कामांची चौकशी करावी यासाठी भारतीय दलित महासंघाने गेली सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला आहे. विभागीय आयुक्त पुणे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना आदेश देण्यात आले त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अखत्यारीत असलेली बांधकाम विभाग, जिल्हा शैल्यचिकित्सक विभाग, जलसंधारण विभाग तसेच माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायती 3 नगरपंचायती यांच्या अखत्यारीत पंधरावा केंद्रीय वित्त आयोग, आमदार निधी, खासदार निधी यातुन केलेल्या विकास कामांवर विभागीय चौकशी समिती नेमावी म्हणून भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीच्या तपशिलाप्रमाणे तसेच पंचायत समिती माळशिरस यांच्या तपशीलाप्रमाणे मंजूर कामे प्रत्यक्षात झालेली नसून कामे कागदावरच आहेत. परंतु प्रत्यक्षात झलेली नाहीत.
त्यामुळे माळशिरस मतदारसंघात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिनांक 24/3/2025 रोजी अकलूज प्रांत कार्यालय समोर भारतीय दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार रोहित रणदिवे आणि माळशिरस तालुकाध्यक्ष पत्रकार केतन खिलारे हे उपोषणाला बसले असता तात्काळ मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती, माळशिरस यांनी 103 ग्रामपंचायतींची दोन महिन्यात चौकशी करून पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले आहे. मनुष्यबळाचे कारण सांगून गेली सहा महिन्यापासून पत्रव्यवहार चालू असताना प्रशासन जाणून बुजून भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. जर तात्काळ चौकशी समिती नेमली नाही व दोषींवर कारवाई झाली नाही तर विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर दि 24/4/2025 रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रसंगी उपस्थित सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश भाऊ खंडागळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव दिगंबर साठे सर, सोलापूर जिल्हा सहसचिव नंदकुमार काळे, सोलापूर जिल्हा संघटक अनिल मदने, माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमित कांबळे, हनुमंतराव भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin