Ticker

6/recent/ticker-posts

केशवशिवनी येथील पुरातन श्री क्षेत्र केशवराज मंदिराचे बांधकाम पूर्ण; मंदिर जीर्णोद्वार व कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन



 सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

मंदिर जीर्णोद्वार व कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा श्रीक्षेत्र केशवशिवनी येथील पुरातन ,श्री केशवराज मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून दिनांक ३१मार्च ते  ०६ एप्रिल .श्रीराम नवमी महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे .दिनांक ०१.०४.२५ ते ०३.०४ २५ मंगळवार दिंडी प्रदक्षिणा सोहळा दीप प्रज्वलन प्रायश्चित्त विधी ,गणेश पुजन पुण्याहवाचन पीठ देवता स्थापन, अग्निस्थापन, जलाधिवास आरती .दि.०२.०४.२५ वार बुधवार श्रीचे प्राप्त :पूजन , स्थापित देवता होम , स्नपन विधी, धान्यादिवास हवन ,आरती  .दि.०३.०४.२५ वार गुरुवार देवता हवन, न्यास विधी ,बलिदान ,मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण पूर्णाहुती, नैवेद्य महाआरती. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र केशवशिवणी येथे पाच मंदिराचा जीर्णोद्वार हा हेमाडपंथी  स्वरूपाचा असून पाचही मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामध्ये श्रीरामाची मुर्त ,संत ज्ञानेश्वर माऊली मूर्त, संत नरहरी महाराज मुर्त ,पार्वती मुर्त संत मुक्ताबाई मुर्त ,गणेश मुर्त, त्याचबरोबर गावाचे आराध्य दैवत श्री केशव राजाचे भव्य असे मंदिर पूर्णाकूती तयार झाले असून ,नेपाळ येथील गंडकी पाषाणापासून श्री केशवराजाची पूर्णाकूती मूर्त तयार झाली .

, ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम नवमीच्या  मुख्य पर्वावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ,त्यामध्ये ३१.०३.२५ सोमवारला हरिभक्त परायण श्री बाबुराव महाराज काळे ताड शिवणीकर, यांचे रात्रीला ८.३० ते १०.३०वा. हरिकीर्तन दिनांक १/४/२२५ वार मंगळवार ला ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्रीक्षेत्र पंढरपूर विश्वस्त दिनांक  ०२-०४-२५  वार बुधवार ला ह भ प श्री शंकर महाराज शास्त्री एम ए संस्कृत रामायणाचार्य रिसोड यांचे कीर्तन दिनांक ०३-०४-२५ वार  गुरुवारला गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांचे कीर्तन दिनांक ०४-०४-२५ शुक्रवार ह भ प श्री वाणीभूषण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं यांचे कीर्तन दिनांक ०५-०४-२५  शनिवार ह भ प विवेक महाराज केदार नाशिक यांचे कीर्तन दिनांक ०६-०४-२५ रविवार सकाळी १० ते  १२ भ प श्री रमेश महाराज जायभाये श्रीक्षेत्र वैष्णवगड यांचे रामजन्माचे कीर्तन व दुपारी १२.३० ते०२ वाजेला ह भ प प्रेमानंद महाराज देशमुख श्री माऊली आश्रम पांगरी फाटा यांचे काल्याचे किर्तन होईल .

 नंतर महाप्रसाद होईल या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी परमपूज्य परमहंस परिब्रजकाचार्य श्री श्री 1008 स्वामी हरि चैतन्य़ानंद सरस्वती जी महाराज वेदांताचार्य तत्त्वज्ञान काशी .परमपूज्य गुरुवर्य अनंत विभूषित परमहंस  आचार्य महामंडलेश्वर श्री श्री 1008 स्वामी कृष्ण चैतन्य पुरी जी महाराज निळकंठेश्वर. हरिभक्त परायण प.पु.सानप गुरुजी ‌नाना श्रीक्षेत्र वैष्णवगड .श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज भांगसी माता गड छत्रपती संभाजीनगर. परमपूज्य श्री 1008 स्वामी साधन चैतन्य जी महाराज श्री साखर तळे देवगाव कुंडपाळ. गुरुवर्य परम श्रद्धेय श्री महंत भागवत गिरीजी महाराज अध्यक्ष रामगिरीजी महाराज ट्रस्ट श्रीक्षेत्र शंभू महादेव देवस्थान .पं.पु.श्री 108 सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज श्री जगद्गुरु पलसिद्ध महास्वामीजी धर्मपीठ साखरखेर्डा .गुरुवर्य श्री महंत बालक गिरीजी महाराज अध्यक्ष सद्गुरु श्री सेवागिरीजी महाराज सेवा ट्रस्ट श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान. परमपूज्य श्री श्री १००८ स्वामी अमोलानंदजी महाराज सचिदानंद आश्रम सावत्रा. प पु श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ श्रीक्षेत्र लाडगाव छत्रपती संभाजी नगर .या संत महंतांच्या उपस्थितीमध्ये हा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे .

 या कार्यक्रमासाठी माननीय प्रतापरावजी जाधव साहेब‌ केंद्रीय मंत्री  स्वतंत्र प्रभार आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. माननीय मनोज भाऊ कायंदे आमदार सिंदखेडराजा माननीय सिद्धार्थ खरात आमदार मेहकर माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे माजी आमदार तथा माजी मंत्री. माननीय डॉक्टर शशिकांतजी खेडेकर माजी आमदार सिंदखेड राजा .माननीय तोतारामजी कायंदे माजी आमदार सिंदखेडराजा .माननीय विनोद भाऊ वाघ भाजपा प्रदेश प्रवक्ते.श्री.डाॅ.डि.एस.शिंदे साहेब.श्री.प्रभाकरजी ताठे. श्री विलासराव देशमुख माजी सभापती सिंदखेडराजा. श्री वैभव देशमुख सर  माजी सरपंच दुसरबीड .माननीय श्री शंकरराव उगलमुगले सर माजी सरपंच जागदरी .श्री विकास आंधळे सरपंच केशव शिवणी . 

या कार्यक्रमासाठी महाप्रसादाचे अन्नदाते श्री नारायणराव  बंडुजी उदावंत केशव शिवनीकर महाआरतीचे यजमान माननीय मनोज भाऊ कायंदे आमदार सिंदखेडराजा माननीय सुरेशराव अण्णा टाक उद्योजक परळी वैजनाथ यांचे शुभ हस्ते होईल. महाप्रसादाचे वितरण माननीय प्रतापरावजी जाधव साहेब केंद्रीय मंत्री स्वतंत्र प्रभार आयुष्य आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय .या कार्यक्रमाचे आयोजक श्री वसंतराव नारायणराव उदावंत अध्यक्ष केशवराज महाराज संस्थान श्री मुर्डेश्वर संस्थान केशव शिवनी तथा ग्रामस्थ श्रीक्षेत्र केशव शिवणी .या सोहळ्याचा समारोप महाप्रसाद वितरणाने ०६-०४- ,२०२५ रोजी करण्यात येणार आहे .याचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त यांनी केले आहे.