Ticker

6/recent/ticker-posts

कु.कॄष्णाली निचळ हिची नवोदय विद्यालय मध्ये निवड



प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर 

मंगरूळपिर--केंद्र शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित नावाजलेल्या जवाहर नवोदय विद्यालय यांचा 2025 च्या परिक्षेचा निकाल लागला असून या प्रवेश प्रक्रियेत सहभाग असलेल्या मंगरूळपिर शहरातील के.डी.चांडे इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी कु.कॄष्णाली निरंजन निचळ हिने मेहनत घेऊन प्रामाणिक अभ्यास करून घवघवीत यश संपादन केले असून हिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री ऍड.संतोष चांडे सर यांनी कौतुक केले 

तसेच चांडे मॅडम, मुख्याध्यापक शिंदे मॅडम,व सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी तिचे भरभरून कौतुक केले व शाबासकी ची थाप दिली.कॄष्णाली ही लहान पणापासूनच हुशार मुलगी होती, कोणत्याही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा व अभ्यास मध्ये गोडी निर्माण असायची अनेक उपक्रमांमध्ये प्रावीण्य मिळवण्याची जिद्द चिकाटी असायची सर्व च स्तरावरून तिचे कौतुक करीत तिच्या यशाचे श्रेय ती आईवडील आणि शिक्षक,शिक्षिका व यशाचा पाया रचनाॖर्या शिकवणी वर्ग शिक्षक श्री राम पांढरे सर यांना देते.व सर्व मित्रमंडळी,नातेवाईक तिच्या यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा देत आहे.