प्रतिनिधी शैलेश कवळे
खापा (तुमसर) :
उन्हाळ्याची चाहुल लागली की,सर्वांच लक्ष थंड पाण्याकडे जातो, रामटेक-खापा मार्गावरील ये-जा करणाऱ्या माथेफिरू लोकांना पिण्याचे थंड पाणी मीळाव याकरीता प्रहार दिव्यांग क्रॅांती संघटनेच्या वतीने व श्री शेषरावजी गणविर (तुमसर तालुका प्रमुख) यांच्या पुढाकाराने आज दिनांक 21 मार्च 2025 मौजा खापा (तुमसर) येथे. "20 मार्च 1927 महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिवस निमित्त " प्याऊ " चे उद्घाटन करण्यात आले.
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनीक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो.
ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते
कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष खुशालजी भोयर ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पाहुणे डॉ.मनोजकुमार नंदेश्वर (पशुधन अधिकारी) सरिता सिंदपुरे खरबी, दुर्गा बाभरे, संजय ठवकर, हारगुडे जी तलवारे जी, अनिल तुमसरे, टेंटेबाई, कार्यक्रमचे प्रास्ताविक शेषराव गणवीर तुमसर तालुका प्रमुख (प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तुमसर )यांनी केले, व सर्व उपस्थित दिव्यांग, निराधार, कामगार व गावकरी उपस्थित होते.





Social Plugin