Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छतेचे महत्व या विषयावर शिवाजी हायस्कूल मध्ये निबंध स्पर्धा संपन्न



 देगलूर- प्रतिनिधी  .......

सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदानगर सगरोळी विद्यालयात स्वच्छतेविषयी प्रत्येक विद्यार्थ्यात मूल्याची रुज वणूक व्हावी. स्वच्छतेमुळे त्यांचे आरोग्य चांगले रहावे. याची जाणीव व्हावी. स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार या विद्यार्थ्यांनी करावा. या उद्देशाने शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या निबंध स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

   यामध्ये प्रथम क्रमांक म्हणून कुमारी ऐश्वर्या शामसुंदर तमशेट्टे, द्वितीय क्रमांकाने श्वेता लखमाजी आवरूल, तृतीय क्रमांक अनुष्का अनिल शेळके, तसेच उत्तेजनार्थ श्रद्धा राजेश्वर कवडे या विद्यार्थ्यांनी या निबंधात आपले सुंदर विचार मांडून बक्षीस मिळवले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक श्री संभाजी गायकवाड यांनी त्यांना बक्षीस देऊन केले.

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गांधी परिषद चे समन्वयक श्री कैलास को दळे व मराठी विषयाचे प्रा.श्री नवनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व व स्वच्छता राखण्याची व दुसऱ्यांना स्वच्छ राहण्याची मूल्य रुजली.