मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
वाशिम, दि.२८ फेब्रुवारी वाशिम जिल्ह्यातील मौजे खेर्डा (जिरापुरे), ता. कारंजा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूची बाधा आढळून आली आहे. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
*बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना*
✅ स्वच्छता व आरोग्यदायी उपाययोजना: पोल्ट्री फार्म स्वच्छ ठेवणे आणि जैवसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक.
✅ लक्षणे दिसल्यास तत्काळ माहिती द्या: पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यू, श्वास घेण्यास त्रास, सुस्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
✅ बाधित पक्ष्यांची वाहतूक टाळा: संसर्ग रोखण्यासाठी बाधित पोल्ट्री पक्ष्यांची ने-आण करण्यास सक्त मनाई.
✅ स्थानांतरीत व वन्य पक्ष्यांवर लक्ष ठेवा: स्थलांतरीत पक्षी, कावळे किंवा अन्य वन्य पक्षी मृत आढळल्यास तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.
✅ फवारणी करणे आवश्यक: ग्रामपंचायतीमार्फत १ लिटर पाण्यात ७ ग्रॅम धुण्याचा सोडा मिसळून पोल्ट्री शेड, गोठे, गटारे, नाल्यांवर फवारणी करावी. हे दर १५ दिवसांनी तीन वेळा करण्यात यावे.
नागरिकांनी सतर्क रहावे आणि पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गणेश पवार आणि उपआयुक्त डॉ. अरुण यादगिरे यांनी केले आहे.





Social Plugin