Ticker

6/recent/ticker-posts

जानगीर महाराज संस्थांनवर लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ



मालेगाव -प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 


शिरपूर : 300 वर्षांपूर्वी श्री समर्थ जानगीर महाराज व संत मिर्झा बाबा हे समकालीन मित्र होऊन गेले तेव्हा त्यांनी गावाला एकतेचा संदेश दिला.

महाशिवरात्री यात्रेची सांगता महाप्रसादाने होते. महाप्रसादाला सुरुवात होण्याआधी जानगीर महाराज संस्थान वरून नैवेद्य संत मिर्झा अमूल्ला बाबा दर्गामध्ये नेण्यात बँड पथकाच्या गजरामध्ये वाजत गाजत. मिर्झा बाबा या दर्ग्यावर नेण्यात आला आहे.आला त्यानंतर संस्थांनवर महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला .)

येथील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री समर्थ जानगीर महाराज संस्थान वर महाशिवरात्री यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता २७ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने झाली यावेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

येथील जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्री निमित्त सतत सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भजन भक्ती, गावांमधून नगरप्रदक्षिणा, काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम पाठ, हरिपाठ, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सांगता दि. २७ फेब्रुवारी रोजी महाप्रसाधने झाली यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांनी संस्थानवर येवुन महाप्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसादासाठी ७१ क्विंटल वांग्याची भाजी १५१ क्विंटल गव्हाची पोळी असा प्रसाद तयार करण्यात आला होता या प्रसादाची पूजन परमपूज्य महेशगिर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली येवता येथील परमपूज्य शांती पुरी बाबा, सिताराम महाराज, दया रामगिरी महाराज योगेश दशरथ महाराज महंत पुनमगिरी महाराज, महंत भारती महाराज माहूर, महंत देवेंद्र गिरी महाराज महंत देवपुरी महाराज महंत प्रल्हाद महाराज यांच्यासह बाहेर गावावरुन आलेले संत महंत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

तत्पूर्वी ह भ प संजय महाराज लहाने करंजी यांचे काल्याचे किर्तन झाले त्यानंतर लगेच महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी संस्थांनवर प्रसाद घेण्यासाठी हजेरी लावली होती महाप्रसाद वितरणाकरिता शिरपूर, दुधाळा, वसारी, करंजी, शेलगाव, पांगरखेडा, ढोरखेडा, तिवळी, वाघी, खंडाळा, यांच्यासह इत्यादी खेड्यातील ट्रॅक्टर मालकांनी संस्थांनवर महाप्रसाद वितरणासाठी सेवा दिली भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दि. जनता बँक, निशांत पतसंस्था, डॉक्टर असोशियन, मेडिकल असोसिएशन, एम आर असोसिएशन, महाराष्ट्र अर्बन पतसंस्था , यांनी केली होती

हा कार्यक्रम संस्थेचे मठाधिपती महेशगिर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर व परिसरातील गावातील नागरिकांनी परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वीरितया पार पाडला यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.