Ticker

6/recent/ticker-posts

बालकांच्या सर्वांगीण सदृढ आरोग्यासाठी बाल स्वास्थ्य कार्यक्रम महत्वाचा : डॉ. किरण निमजे




पाटणच्या आरबीएसके पथकाचे उत्कृष्ठ काम

 पाटण  (दिनकर वाईकर)

 शाळा व अंगणवाडीतील शुन्य ते आठरा वर्ष वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करीता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. जन्मजात बालकांना ऐकु न येणे, हृदयाचे आजार यांसह इतर आजारांवर मोफत उपचार या माध्यमातून केले जातात. पाटणच्या आरबीएसके पथकामार्फत तालुक्यात चांगल्या प्रकारे सेवासुविधा उपलब्ध केली जात असून पालकांनीही मुलांच्या सदृढ आरोग्याच्यादृष्टीने काळजी घ्यावी. बालकास आजार असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण निमजे यांनी केले.

               पाटण येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील छ. शिवाजी महाराज सभागृहात लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय पाटणद्वारा आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी पाटणच्या नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. रघुनाथ नांगरे, डॉ. बाबासाहेब सावंत, मोरगिरी आरोग्य केंद्राचे डॉ. ननावरे, तालुका वैद्यकीय विभागाचे डॉ. मुसा चाफेरकर, मुख्याध्यापिका सौ. श्वेता गिजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          डॉ. निमजे म्हणाले, जन्मता मुलांना काही आजार असल्यास पालकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, जेणेकरून त्या बालकावर वेळेत उपचार होतील. आरबीएसके कार्यक्रमांतर्गत अशा आजारांवर मोफत उपचार व ऑपरेशनही केले जाते. व्यंगत्व बालकांबाबत डॉक्टरांना समजल्यामुळे हा कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे राबवता येईल. त्याचा फायदा शुन्य ते आठरा वर्षे वयोगटातील मुलांना होईल. त्यासाठी पालकांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

           प्रास्ताविकात आरबीएसकेच्या नोडल अधिकारी डॉ. कांचन पोतदार यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१३ पासून झालेल्या गुंतागुंतीच्या ९८ हृदय शस्त्रक्रिया तसेच मायनर शस्त्रक्रिया ६६५ याबाबचा आढावा दिला. पाटण या अत्यंत दुर्गम ठिकाणी आरबीएसकेत कार्यरत असणारी चार पथके विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ पध्दतीने सेवा येत आहेत. यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमामुळे आर्थिक परिस्थिती नसताना महागड्या शस्त्रक्रिया मोफत होतात, असे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी आरबीएसके पथकाच्या डॉक्टरांनी बालकांची व किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली व सुरक्षित सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन केले. डॉ. विशाल दंडवते यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले. नोडल अधिकारी डॉ. कांचन पोतदार व डॉ. ओमकार पोतदार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास आरबीएसके पथकाचे डॉ. संदीप पाटील, डॉ. हमीद तडवी, डॉ. सुनिता काटरे, डॉ. सरीता कांबळे, डॉ. संगोगिता पवार, औषध निर्माता सुजाता जाधव, प्रज्ञा तासगावकर, भाग्यश्री कुंभार, नागिणी वळसंग, आरोग्य सेविका वैशाली लोंढे, सोनाली खैरमोडे यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक मुले व मुलींच्या शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.


पंधरा दिवसांपूर्वी पाटण येथील राजलक्ष्मी राजेंद्र चव्हाण या मुलीची हरणीयाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. याबद्दल तिचे व पालकांचे डॉ. संदीप पाटील व डॉ. सुनिता काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.