मितेश जैन - कल्याण प्रतिनिधी
कल्याण : जागतिक विज्ञान दिनानिमित्त शनिवारी उल्हासनगर मधील श्री चैतन्या टेक्नो स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका चंद्रकला मोरया , प्रादेशिक प्रभारी अभिषेक , विभागीय प्राथमिक समन्वयक मेघा तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनात इयत्ता नर्सरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते. ध्वनीचे प्रवर्तन , मानवी श्वसन उच्छ्वास यांचे प्रतिकृती असणारी फुफ्फुसांचे कार्य, जेसीबी , स्मार्ट सिटी , पाणी गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती , ठिबक सिंचन प्रणाली , सौर यंत्रणा , रोबोटिक्स हात , रेन वॉटर हार्वेस्टिंग ,बिना चालकाची कार, हायड्रोलिक मशीन ,वाहतूक शिक्षण ,यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच, विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे, सुक्ष्मदर्शक यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विविध प्रकारे मांडणी करण्यात आली होती.
यासाठी प्राथमिक विभागातील प्राथमिक समन्वयक प्रांजली वराडे , पूर्व प्राथमिक समन्वयक प्रियंका विश्वकर्मा , डीन चंद्रशेखर , शिक्षक शेखर शर्मा , पल्लवी पवार यांनी सहकार्य केले. शाळेमधील विद्यार्थ्यांनी सौर उर्जा , प्रकृती संरक्षण , वीज क्लब याच्यासह अन्य विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. तसेच पालकांसाठी फन गेम देखील क्रीडाशिक्षक मितेश जैन , कुशल तिवारी , राकेश कुरकुरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रदर्शनात शाळेतील नर्सरी ते नववीतील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला. विज्ञान प्रदर्शन संपन्न करण्यासाठी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या सर्व स्टाफच्या मोलाचा योगदान होता.





Social Plugin