महेश देशमुख @ ग्रामीण प्रतिनिधी मेहकर
*मेहकर शहरातील अतिव्यस्त अशा नागसेन चौक येथे प्रवासी थांबा निवारा बनविण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आगार व्यवस्थापकाकडे तक्रार अर्ज**निवारा न बनवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष सदार यांनी दिला इशारा
मेहकर शहरातील अतिव्यस्त अशा नागसेन चौक जानेफळ डोणगाव रोड येथे पूर्वी प्रवासी थांबा निवारा होता.परंतु नागसेन चौक येथे वाढते अतिक्रमणामुळे प्रवासी निवारा बनविण्यात आला नाही. या अतिक्रमणामुळे प्रवाश्यांना रस्त्यावरच उभे राहुन बस ची प्रतिक्षा करावी लागते व रस्त्यावरील सुसाट वाहनामुळे प्रतिक्षा करणाऱ्या प्रवाश्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे तरी सुद्धा प्रवाशांना बस ची प्रतिक्षा ही कडक उन्हातच करावी लागते पुर्वी जसा प्रवासी निवारा होता तो प्रवासी निवारा पुन्हा बनविण्यात यावा अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष संतोष सदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर आगार प्रमुख यांना तक्रार अर्ज दिला.
प्रवासी निवारा बनविण्यात आला नाही तर मनसे स्टाईल ने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी संतोष सदार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष ,अरूण दुतोंडे, सुनील मोरे, शेख इमरान, सचिन गवई, भिकाजी सरदार, गणेश साबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin