*जलतारा योजना पाणीटंचाईवर प्रभावी उपाय तहसीलदार दीपक पुंडे व कृषी सहाय्यक डी के रणवीर*
मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मेडशी :22/03/2025
वाशीम जिल्ह्यात 'जलतारा' कामांना गती देण्यासाठी स्वतः वाशिम जिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जात आहे.जिल्ह्यात जलतारा प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनाची कामे युद्ध पातळीवर सुरू झाली आहेत.या कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध गावांमध्ये श्रमदान आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज मालेगाव तालुक्यातील तहसीलदार दीपक पुंडे साहेब यानी सर्वप्रथम मेडशी येथील जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन ग्रामस्थांना योजनेची माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जलतारा उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.
जलतारा योजनेंमुळे भूजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहणार आहे. शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, पावसाचे पाणी साठवता येईल आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे
प्रशासनाच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन जलतारा खोदणीसाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. असे मालेगाव चे तहसीलदार दीपक पुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात सांगण्यात आले. तसेच मेडशी येथील उमेद या महिला बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून विविध विषयावार चर्चा करण्यात आले.त्यांनतर मेडशी येथील प्रगतशील शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांच्या शेतामध्ये जाऊन तहसीलदार दीपक पुंडे यांनी स्वतः श्रमदान करून जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करून उपस्थित गावातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.आज काल निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस तर मुसळधार होत आहे.मात्र जमिनीतील शेतकऱ्यांचा वाढलेला रासायनिक खताचा जास्तीचा वापर त्यामुळे जमिनीचा कस निघून गेला असून जमिनी मृत झालेल्या आहेत. जमिनीची पाण्याची शोषण करण्याची क्षमता कमी झाली.परिणामी मुसळधार किंवा जास्त मुबलक पाऊस होऊन सुद्धा जमिनीत पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर किंवा उतारवटीत जिथे पाणी साचते अशा ठिकाणी जलतारा घेतल्यास त्याचा शेतातील विहिरीला बोरला त्यांना नक्कीच फायदा होईल व जमिनीची पाण्याची पातळी वाढेल असे ठामपणे उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी सहायक डी के रणवीर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.यावेळी सर्व उपस्थित सर्व गावकरीयांनी मिळून दोन हजार पेक्षा जास्त जलताराचे शोषखड्डे आम्ही मेडशी परिसरात घेऊ असं आश्वासन मेडशी गावचे युवा सरपंच शेख जमीर यांनी दिले.तसेच मेडशी गावचे युवा सरपंच शेख जमीर शेख गणीभाई व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारीयांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन तहसीलदार साहेबांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित उल्हासराव मेडशीकर,यशवंत घुगे,शौकत पठाण, रामदास सोलनोर,रणजित मेडशीकर,कैलास ढाले,गोरखनाथ भागवत,प्रदिप तायडे,धीरज मंत्री, सुधाकर चोठमल,अभिषेक घुगे,अमोल तायडे,प्रशांत मेडशीकर, आकाश जाधव,दिलीप देशमुख, विट्ठल भागवत,जावेद भवानीवाले,सचिन साठे यांच्या सह विजय अवचार,केशव अवचार,गजानन उमाळे,गजानन बनायत,घनश्याम साठे,दिलिप ताजने या महसुल कर्मचाऱ्यांची उपस्थित होती.





Social Plugin