जलतारा योजनेत दोन हेक्टर क्षेत्राची मर्यादा व कुटुंबात एकालाच लाभ अट शिथील करा*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानी वाले
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत चालवण्यात येणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी अश्या जलतारा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्र व कुटुंबात जॉब कार्ड मध्ये नाव समाविष्ट असलेल्या पैकी एकालाच लाभ मिळणार असा नियम व निकष लावण्यात आला.त्यामुळे बहुतांशी शेतकरी इच्छा असताना सुद्धा त्याचा लाभ घेता येत नाही.वंचित राहत असलेल्या भट्क्या व विमुक्त समाजातील शेतकऱ्याला सदर अट व नियम शिथिल करून लाभ द्यावा.जेणेकरून त्याच्या शेतात जलतारा बनवून जमिनीमध्ये पाणी मुरवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल व भविष्यात वाशिम जिल्हा हा दुष्काळ मुक्त होईल.
वाशिम जिल्हा हलक्या प्रतीचा जमिनी असलेला जिल्हा आहे.येथे जंगल काही भागात खूप मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र जमिनी या हलक्या प्रतीच्या असल्यामुळे पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन सुद्धा जमिनीत पावसाचे पाणी मुरत नाही व बहुतांशी पावसाचे पाणी वाहून जाते.त्यामुळे येथे हिवाळ्याच्या मध्याण्या पासूनच पिण्याच्या व शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवते.जलतारा हे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवसंजीवनी ठरू शकते यात काही शंका नाही.जलतारा ही एक सामाजिक योजना आहे,जी ग्रामीण भागात पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राबवली जाणार आहे.या योजनेत जमिनीच्या प्रत्येक जिरायती एक एकर शेतीमध्ये 6 फूट खोल आणि 5 फूट चौरस खड्डा खोदला जाते.यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.मात्र काही जाचक अटींमुळे गरजू व उत्सुक असून सुद्धा शेतकरी वर्ग या योजने पासून वंचित राहत आहे.





Social Plugin