Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना योद्धावर आली चक्क उपोषण करण्याची वेळ


 *थकित मानधन देण्यास शासन टाळा टाळ करीत असल्याचे उपोषण करते यांचा आरोप*

अंबड प्रतिनिधी गणेश सपकाळ

जिल्हा रुग्णालय जालना, कोव्हीड-19 मध्ये आर. टी. पीसीआर लॅबमध्ये कार्यरत असलेले पगार मिळणे बाबत (थकीत मानधन रु.52000-/) संदर्भ अर्जदार विकास प्रभाकर भरपुर रा.रुई ता.अंबड जि. जालना यांनी उपोषण सुरू केले आहे.सविस्तर माहिती अशी की,कोव्हीड-19 ह्या  माहामारीमध्ये RT- PCR LAB JALNA / जिल्हा रुग्णालय जालना,येथे विकास प्रभाकर भरपुर हे डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदावर कर्यारत होते.जिवाची पर्वा न करता राष्ट्रीय आपत्ती मध्ये काम केले.

आणि आज तबल तीन वर्षे झाले.अदयाप सुध्दा पगार झालेला नाही.त्यांनी वेळोवेळी अर्ज दिले असुन त्यांचा पाठपुरावा देखील कित्येक वर्षे पासून करीत असुन त्यांची दखल शासनाकडुन घेत नसल्याचा अरोप उपोषण कर्ते यांनी केला.या संदर्भात RBSK च्या जिल्हा नियोजन मिटींग मध्ये याची नोंद घेण्यात आलेली असुन जिल्हाधिकारी यांनी संबंधीतास तसा पगार काढण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या.

तरी सुध्दा कुठलीही दखल न घेतल्याने  विकास प्रभाकर भरपुर यांनी  दिनांक 15 मार्च 2025 पासून आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर त्यांचे उपोषण सुरु असुन आज उपोषणाचा चा दुसरा दिवस आहे.जर उपोषणादरम्यान जिवतास बरे वाईट झाल्यास यांची सर्वस्व जबाबदरी शासनाची राहील व मागणी जो पर्यत मंजुर होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते विकास प्रभाकर भरपुर यानी सांगितले आहे.