( जिमबिम या जिम चा प्रथम वर्धापन दिन)
संदिप गावडे, आष्टा /प्रतिनिधी
आष्टा येथील जिम बीम च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व्यायाम व आहाराबद्दल मार्गदर्शक करताना लोकांनी आपल्या जीवनशैलीनुसार तसेच शारीरिक रचनेनुसार आहार आणि व्यायाम केला पाहिजे. व्यायाम म्हणजे कठोर मेहनत आणि डायट म्हणजे उपासमार नसून ती एक जीवनशैली आहे. रोजच्या आहारामध्ये प्रथिने खूप महत्त्वाची आहेतच, पण परिपूर्ण आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके आणि फायबर यांचे प्रमाण 50-20-20 या स्वरूपात असायला हवीत. असे प्रतिपादन डॉ. विश्वजा वैभव शिंदे यांनी यावेळी केले.
डॉ. विश्वजा शिंदे पुढे म्हणाल्या, आठवड्यातील किमान चार तास तरी आपण व्यायाम केला पाहिजे. व्यायामात स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याशिवाय पर्याय नाही. आठवड्यातील दोन दिवस कार्डिओ आणि चार दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केले पाहिजे. व्यायाममध्ये हाडाच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या स्थिरतेसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्त्वाचे आहे. यासाठी चांगले प्रशिक्षण व प्रशिक्षक गरजेचे आहे. ते या जिमबिमच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याची खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
जिमबीम सतत वेगवेगळे उपक्रम घेऊन लोकांच्यात जागृती निर्माण करत असते. त्यांच्या या कार्याबद्दल डॉ. विश्वजा शिंदे यांनी कौतुक केले. यावेळी जिमबीमचे मालक व प्रशिक्षक शुभम ढोले यांनी स्वागत केले. सुनीता ढोले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच डॉ. नंदकिशोर आटूगडे यांनी सूत्रसंचालन केले. सायकलिस्ट अमोल पाटील यांनी आभार मानले. यावेळी जिमबीमचे सदस्य व हितचिंतक उपस्थित होते.





Social Plugin