गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
बिहारमधील बौद्धगया महाविहारमुक्ती आंदोलन देशभर पेटले असून कारंजा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जयस्तंभ चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव भारत भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर उके, राजा चव्हाण, सचिन खांडेकर, कार्यवाह कॅप्टन नंदू वानखडे, शीला राऊत, तालुकाध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांनी सदर मोर्चाचे नेतृत्व केले. या मोर्चात बुद्ध गया येथे सुरू असलेल्या महाविहार मुक्ती आंदोलन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने जय घोष करीत मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांना देऊन मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन बिहार राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना दिले आहे. या मोर्चाला पूज्य भन्ते संघबौधी, राकाँ शरद पवार गटाचे डॉ. रमेश चंदनशिवे, राकाँचे तालुकाध्यक्ष मनोज कानकीरड, माजी जि.प. सदस्य संकेत नाखले, गजानन अहमदाबादकर, भारतीय बौद्ध महासभेच्या शीला राऊत, जिल्हा कार्यवाहक कॅप्टन नंदू वानखडे आदींनी संबोधित केले. मोर्चाचे संचालन किशोर उके यांनी तर आभार सचिन खांडेकर यांनी केले.
.jpg)




Social Plugin