Ticker

6/recent/ticker-posts

ओमिनी गाडीतील सीएनजी सिलेंडरचा स्फोट.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                                                                                             

    वन्नाळी येथील इंग्रजी शाळेचे संस्थाचालक विजय जोगुलवार यांच्या सीएनजी वर चालणाऱ्या ओमिनी गाडीतील सिलेंडरचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला. ही आग आजूबाजूच्या दुकानांना लागल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही घटना 17 मार्च सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथे गावातीलच विजय जोगुलवार यांची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेचे विद्यार्थी ने आण करण्यासाठी संस्था चालक ओमिनी गाडीचा वापर करीत असत 17 मार्च रोजी शाळेची वेळ संपल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी ओमिनी गाडी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या स्वतःच्या किराणा दुकानासमोर उभी केली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजय जोरगुलवार यांनी गाडी चालू करण्याचा प्रयत्न करताच गाडीतील सिलेंडरचा प्रचंड स्पोर्ट झाला. या स्फोटामुळे विजय जोरगुलवार जखमी झाले. त्यांना देगलूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गाडीला लागलेल्या आगीमुळे विजय जोरगुलवार यांचे किराणा दुकान जळून खाक झाले.

 सद्दाम महबूब शेख यांचे घर, मनमत मोबाईल शॉपी, चांद मिस्त्रीचे सिमेंटचे दुकान रमेश इबीतदार यांचे हेअर कटिंग सलून, आजूबाजूच्या काही दुकानांना आग लागली. ही आग वरचेवर वाढत गेली आग लागल्याची माहिती मिळताच देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल पोलीस आणि गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. बस स्थानकावरच लागलेल्या प्रचंड आगीमुळे इतर वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने देगलूर आणि नांदेड जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबविली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वृत्त लिहीपर्यंत आगेमुळे आजूबाजूच्या घराची आणि दुकानांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वरतीवला जात आहे.