Ticker

6/recent/ticker-posts

डेहणी येथे प्राथमिक शाळेत आरोग्य शिबिर संपन्न



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

 दिग्रस : तालुक्यातील डेहणी येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दिनांक 24 फेब्रुवारीला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. प्राथमिक आरोग्य केंद्र वसंतनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिराज शेख, डेहणी येथील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिजवान शेख तसेच विटा उपकेंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रसिका माहुरे, डॉक्टर युवराज जाधव, अर्चना गावंडे ए.एन. एम, कल्पना गुंडवाडे, मदतनीस आदी वैद्यकीय चमुने एक ते आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. जोशी विद्यार्थ्यांना औषधी वाटप करण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

 यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी शिबिराला हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजू ढोले यांनी तर संचालन शिक्षक रमेश जाधव यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शरद चौधरी, एकनाथ तायडे,विशाल उडाके, रवींद्र जगताप, आकाश ठाकनिकर, मंगला देवतळे, सुषमा दुधे, शिल्पा कळंभे,शितल मेश्राम, मेघा गुंडावार, अश्विनी ठेंगे,स्वाती शहा या शिक्षक वृंदासह दिनेश मोरे, कविता चव्हाण,वर्षा मोरे, कल्पना एडगलवार यांनी या उपक्रमासाठी मोलाची मदत केली.