Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड शहरातील भोईवाडा परिसरात नालीसफाई न झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत लाडे यांचा आंदोलनाचा इशारा



.यशवंत पवार@ छत्रपती संभाजीनगर 


कन्नड शहरातील मध्यवस्तीत असलेला भोईवाडा, भीमनगर, परिसरामध्ये अनेक दिवसापासून नाली साफसफाई न झाल्याने नाल्या तुडुंब भरून कडेला असलेल्या पाण्याच्या नळाला गटारीच पाणी येत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ कारवाई न झाल्यास न. पा. कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा  लाडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

तसेच निवेदनात कन्नड शहरातील बस स्टँड समोरील पथदिवे बंद चालू अवस्थेत तसेच भीमनगर, भोईवाडा, येथील काही पोलवरून काढून नेलेले पथदिवे तसेच, भोईवाड्यातील काही भागात पोलची व्यवस्था करून पथदिवे बसवण्यात यावे. 

कन्नड शहरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नवीन आठ ते दहा ची जलवाहिनी पाईप लाईन करण्यात यावी प्रभाग क्रमांक पाच मधील ओपन स्पेस वर झालेले शुभशोभीकरण कंपाउंड वॉल मधील काँग्रेस गवत बाभळीची झाडांची साफसफाई करण्यात यावी प्रभाग क्रमांक पाच ओपन स्पेस गणपती मंदिर येथे पाण्याची टाकी व स्टँडची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था करून  शहरातील प्रत्येक प्रभागात जनतेसाठी कचरा साठवणुकीसाठी कुंडी ची व्यवस्था करण्याची मागणी व इतर समस्या सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत लाडे यांनी  मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे त्यावेळी अनिता लाडे, गंगाधर शिरसाट, चेतन वायडे, राजेंद्र ढोले, शारदा शिंदे, संजय सोनवणे, किशोर कोतकर, किशोर बनसोडे ,पंकज बावणे, आदींची उपस्थिती होती