*"सरनाईक महाविद्यालयाच्या रा.से.यो कार्यक्रमात गावकरी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन"*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
वाशिम ; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत श्री.शिवाजी शिक्षण संस्था वाशिम द्वारा श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन ग्राम झाकलवाडी येथे करण्यात आले. दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी - हागणदारी मुक्त गाव या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते तथा सेनगाव पंचायत समितीचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे समन्वयक सुरेश आघम यांचे प्रमुख मार्गदर्शन करून उपस्थित लाभली. प्रमुख अतिथी यावेळी उपस्थित स्वच्छ भारत अभियान पुरस्कार प्राप्त भारत सरकार प्रदिप पट्टेबहादुर, प्रा.डॉ वसंत राठोड सर, प्रा.डॉ. रविंद्र पवार, श्री. चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी सुरेश आघम यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले महाराष्ट्रातील अनेक गावांनी गाडगेबाबांच्या प्रेरणेने हागणदारी मुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.राज्य सरकार व स्थानिक प्रशासनांच्या सहकार्याने विविध योजनांद्वारे हागणदारी मुक्त गाव निर्माण केले गेले आहेत. हागणदारी मुक्त गावांची संकल्पना समाजातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे फेकलेला कचरा, गटारातील पाणी आणि शौचालये यामुळे होणारे अनेक रोग कमी होतात. गाडगेबाबा आणि तुकाराम महाराज यांनी स्वच्छतेचा आणि मानसिकतेतील सुधारणा करणार्या विचारांची पेरणी केली. आजाच्या नव तरुणांनी स्वच्छता व निरोगी आरोग्यचे महत्व जानवे आपल्या घरातील गावातील कुठलाही व्यक्ती हा उघड्यावर स्वच्छालय न जाता त्यांनी नियमित शौचालयाचा वापर केला पाहिजे.
या वेळी प्रदिप पट्टेबहादुर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले, की संत गाडगेबाबा यांचा मूलमंत्र आपण अंगीकारूण नियमित स्वच्छता ठेवावी वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी आपण घान न पसरवता स्वच्छतेचे महत्व जाणले पाहिजे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा कांबळे यांनी केले.तर सर्वांच्या आभार तेजस्विनी नेहुल इने मानले. यावेळी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मनीषा कीर्तने मॅडम, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.विजय वानखेडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांची मोठी उपस्थिती यावेळी होती.
.jpg)




Social Plugin