तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुशी, येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले काळू पुनाजी ठाकरे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी सुशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करुन सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर गेवराई पं.स.चे शि.वि.अ.महादेव साबळे, केंद्रप्रमुख तथा वि.अ.संजय मोरे, केंद्रप्रमुख तथा वि.अ.विठ्ठल शेमे, केंद्रप्रमुख चंद्रकांत सोनारे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विष्णू खेत्रे यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे ,जेष्ठ शि. वि.अधिकारी प्रविण काळम पाटील यांनी त्यांना दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक काळू ठाकरे यांनी गेवराई तालुक्यात १९९२ पासून संगमजळगाव , मन्यारवाडी , जायकवाडी वसाहत तसेच सुशी येथे असे एकूण ३३ वर्ष शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. तर सेवापुर्ती सोहळ्यास तालुक्यातील अनेक ठिकाणच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बांधव, सुशी येथील आजी माजी शा.व्य.स. अध्यक्ष, सदस्य व आजी माजी सरपंच, उपसरपंच , ग्रा.पं. सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, नातेवाईक, मित्र परिवार, आजी- माजी विद्यार्थी , ग्रामस्थ तसेच पालक उपस्थित होते. दरम्यान यावेळी विद्यार्थी व सहकारी शिक्षक बांधवांनी मुख्याध्यापक ठाकरे यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करुन अनेक नव्या जुन्या आठवणींना भाषणातून उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जवरे तर सुत्रसंचलन भिष्मा घोडके यांनी केले. यशस्वीतेसाठी सुशी जि.प.प्रा. शाळेतील सहकारी शिक्षक पतंगे एस. यू , नागरगोजे बी जे, जवरे एस. एस , राख बी एस, शिंदे ए एल., ढवळे सर यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाच्या शेवटी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंदअश्रूंनी ठाकरे सरांना सेवापुर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा देवून निरोप दिला. त्यांनीही उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करुन प्रेमरुपी शुभेच्छा कायम स्मरणात राहतील अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली.





Social Plugin