Ticker

6/recent/ticker-posts

साताऱ्याला एक सुवर्ण पदक



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सन 2024-25” दिनांक 8 मार्च, 2025 ते 12 मार्च, 2025 पर्यंत येरवडा, पुणे येथील दौलतराव जाधव जेल ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटर येथे पार पडल्या. या स्पर्धांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामधील अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय विभाग, पुणे विभाग, मुंबई विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग अशा 6 विभागातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रनिंग, रिले, लांबउडी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, कराटे, रिंगटेनीस, गोळाफेक, थाळीफेक अशा विविध स्पर्धामध्ये महाराष्ट्र कारागृह विभागातील 300 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य पटकावले. यामधून निवड झालेले खेळाडू संपूर्ण भारतातील राज्यांमधील कारागृह विभागाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होतील.

सातारा जिल्हा कारागृहातून श्री बालाजी मुंडे शिपाई यांची जिल्हा स्तरावर सुवर्णपदकांची कमाई करून या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये निवड झाली होती. त्यांनी कराटे या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून सातारा कारागृहाचे तसेच सातारा जिल्ह्याचे देखील नावलौकिक केले आहे. श्री बालाजी मुंडे कारागृह शिपाई यांनी यापूर्वी विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्ती व कराटेमध्ये सुवर्णपदके पटकावली होती. राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलेने श्री बालाजी मुंडे शिपाई यांची थेट निवड पुढे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये झालेली आहे. 

या वार्षिक क्रिडा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बक्षीसे मिळवून मुख्यालय संघाने सुवर्ण 21, रौप्य 19, कास्य 7, असे एकूण 47 पदके पटकावून एकूण 108 गुण प्राप्त केल्याने General Championship Trophy पटकावली. मुख्यालय संघातील पुरुष खेळाडुमध्ये श्री विशाल देवराम सुसर यांने सुवर्ण 3, रौप्य 1 असे एकूण 4 पदके मिळवून 11 गुण प्राप्त केल्याने तसेच महिला खेळाडुमध्ये श्रीमती अनिता वाघचौरे, नाशिक विभाग, यांनी सुवर्ण 3, रौप्य 1, कांस्य 1 असे एकुण 5 पदके मिळवून 12 गुण प्राप्त केल्याने सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा मान पटकवला. दोन्ही सर्वोत्कृष्ठ खेळाडुंना प्रत्येकी रु 25,000/- रोख बक्षीस देण्यात आले.

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ 12 मार्च 2024 रोजी झाला. या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, भा.पो.से. हे होते. तसेच या क्रीडा स्पर्धांसाठी प्रमुख उपस्थिती डॉ. सुहास वारके, भा.पो.से., अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, श्री योगेश देसाई कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा इत्यादी लाभले. याशिवाय सदर क्रीडा स्पर्धांसाठी श्री नितीन वायचळ, प्राचार्य ट्रेनिंग कॉलेज, सुनील धुमाळ अधीक्षक येरवडा जेल, अनिल खामकर अधीक्षक येरवडा ओपन जेल,  राणी भोसले अधीक्षक ठाणे जेल, हर्षद आहीरराव अधीक्षक मुंबई जेल, वैभव आगे अधीक्षक नागपूर जेल, प्रमोद वाघ अधीक्षक तळोजा जेल, कीर्ती चिंतामणी अधीक्षक अमरावती जेल, नागनाथ सावंत अधीक्षक कोल्हापूर जेल,  अरुणा मुगुटवार अधीक्षक नाशिक जेल, सातारा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे तसेच अधीक्षक विवेक झेंडे, हरिभाऊ मिंड, राजाराम भोसले, एकनाथ शिंदे, सचिन साळवे व इतर सर्वच कारागृहांचे अधीक्षक उपस्थित होते.