Ticker

6/recent/ticker-posts

मुधोनी येथील तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; परिसरात शोककळा



मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी वणी

येथील रहिवासी मनशीराम तावाडे यांचे चिरंजीव सतीश तावाडे (वय २५) यांचा झोपेतच आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोज रविवारी पहाटेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि अत्यंत दुःखद घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश तावाडे यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. नवविवाहित सतीश यांच्या अचानक जाण्याने तावाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मुर्धोणी व परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सतीश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण गावकरी, शिवाजी राजे ग्रुप, वणी तालुका गुरुदेव सेवा मंडळ आणि अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मुधोनी यांच्या वतीने दिवंगत सतीश तावाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. गुरुदेव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि तावाडे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे.