कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: जागतिक जल दिनानिमित्त जळगाव (सो) येथे जालना समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना महाविद्यालयाच्या वतीने क्षेत्र कार्याच्या भेटी अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नरसिंग पवार यांनी जळगाव (सो) येथील ग्रामस्थांना पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे, पाण्याचां योग्य वापर व पाण्याची बचत अथवा जलसंवर्धन कसे करावे या विषयी सखोल मार्गदर्शन केले. पाणी ही निसर्गाची देणं असून मोफत मिळणारी देणगी आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यातील अडचणी जाणीव करून दिली. तसेच पुढील पिढीसाठी आज पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. या वेळी गावातील नागरिक तसेच क्षेत्रकार्य करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता राजू वाघमारे उपस्थित होते.





Social Plugin