वाशिम जिल्हातील शेतकरी पुत्र श्री. संतोष आसोले पाटील आई वडिलांचे स्वप्न पुंर्ण करण्यासाठी सतत धडपड करणारा स्वप्नवेढा तरुण,आई चे निधन झाल्यावरच जगावं कसं हे सातत्याने मनी ध्यास धरून संतोष आसोले यांनी आपल्यातील जिद्द, चिकाटी मेहनती वृत्ती सोडली नाही वाशिम सारख्या ठिकाणी काही मालकांच्या हाताखाली काम करून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले, परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे शिक्षणही अर्ध्यावर सोडत मिळेल तिथे जॉब करायचा अशा प्रयत्नात आसोले यांनी संघर्ष केला, काम करत असताना गरीबीची लाज न बाळगता आज त्याचेच फलित म्हणून एक जिल्हातील उत्कृष्ट नामांकित उद्योजकापर्यंत संतोष आसोले यांनी धाव घेतली आहे, दहा वर्षांपासून मोबाईल वर्ल्ड शॉप चे सेलर्स उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले आसोले यांना यंदाचा मान्यता प्राप्त शीर्षक महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025 सिनेमा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे,
अत्यंत कमी कालावधी मध्ये आसोले यांनी आपले नावलौकिक केले आहे, त्यांच्या कामाचा आवाका पाहता त्यांना अनेक मान्यवराकडून स्मृतीचिन्हे, पुरस्कार मिळाले आहेत, नाशिक येथील रिसील. इन च्या वतीने संतोष आसोले यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने गौरवन्यात आल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,सोमा वाईन व्हिलेज नाशिक येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला, यावेळी समाधान महाजन GST डेप्युटी कमिशनर महाराष्ट्र राज्य, इको बँक चे झोनल म्यॅनेजर आमलेश त्रिपाठी, रिसील. इन चे CEO फाउंडर सुधीर पठाडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.





Social Plugin