Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्याने दखल न घेतल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचा आमरण उपोषण.



शैलेश कवळे : लाखांदूर प्रतिनिधी

              भंडारा - गडचिरोली समृध्दी माहामार्गाला विरोध असुन ज्या शेतकऱ्यांची शेती या समृध्दी माहामार्गात जात आहे.त्या शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान होत आहे.त्या संबंधाने शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार लाखांदूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.परतु अजुन पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे दिनांक 02 मार्च 2025 रोजी पासुन शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कंराडला येथे भानारकर यांच्या घराजवळ म्हणजे ज्या ठिकाणावरु समृध्दी माहामार्ग जात आहे त्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

     ज्या शेतकऱ्यांची शेती समृध्दी माहामार्गात जात आहे त्या शेतकऱ्यांच्या समस्या व इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही असे द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ठोरे यांनी सांगितले. समिती चे अध्यक्ष विनोद ठोरे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले, यावेळी प्रभुजी मेडे,वेंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर, शिशुपाल भांडारकर उपस्थित होते.