कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: दिनांक 01 मार्च 2025 रोजी जळगाव (सो.) या ठिकाणी जालना समाजकार्य महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील लोकांसाठी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव (सो) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम राठोड, डॉ. योगेश मोरे, मंगेश थोरात, मंदाकिनी पठारे, सुवर्णा तोडकर या यांची उपस्थिती होती.
राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू वाघमारे यांनी केले तर प्रस्ताविक डॉ. नर्सिंग पवार यांनी केले. याप्रसंगी शिबिरामध्ये गावातील 41 व महाविद्यालयातील 26 अशा एकूण 67 व्यक्तींचा बी,पी, शुगर, रक्तगट ,थायरॉईड, हिमोग्लोबिन अशा विविध स्वरूपाच्या तपासण्या करण्यात आल्या व सर्वांना विविध प्रकारच्या टॅबलेटचे वाटप करण्यात आले.या शिबिराचे आयोजन प्रा. डॉ. नरसिंग पवार व राजू वाघमारे यांनी क्षेत्रकार्याच्या माध्यमातून केले होते. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.सुधीर गायकवाड, डॉ. दीपक बुक्तरे, डॉ. बालाजी मुंडे, सोमेश गिरी, पृथुंम सावंत यांची उपस्थिती होती.





Social Plugin