Ticker

6/recent/ticker-posts

होळीच्या पूर्वीच पाणीटंचाई पाण्यासाठी होते हातघाई



मालेगांव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

   तालुक्यातील ग्रामीण भागात आता होळीच्या आधीच पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवायला लागले आहे.पाण्यासाठी हातचा कामधंदा सोडून लोकांना हातघाई करीत वणवण भटकावे लागत आहे.

    त्याचे एक उदाहरण म्हणून डोंगराळ भागातील किन्हिराजा येथील ५ सार्वजनिक विहिरी १३ हातपंप व १४० घरगुती बोअरवेल्स असूनही सध्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून गावात पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र धावाधाव होत आहे.

    किन्हिराजा गावात अजूनही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसुन अस्थाइ स्वरूपाची पाणी पुरवठा योजना आहे. तीही फक्त उन्हाळ्यात सुरू होते व ते पाणी केवळ वापरण्या साठीच वापरल्या जाते, जुनी पाणीपुरवठा योजना ही सुरू करण्यात व पाण्याची गळती शोधून काढणे आणि टाकी साफ करण्यात व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची निवड करण्यात व कामाचे नियोजन करण्यात बराच वेळ जातो गावातील ५ सार्वजनिक विहिरी १३ हातपंप व १४० च्या जवळपास खाजगी बोअरवेल च्या पाण्याच्या पातळीचे तळ गाठला असून किन्हिराजा गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवला सुरूवात झाली असून होळीच्या आधीच गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतानी तळ गाठल्याने होळी पूर्वीच पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. तेव्हा येणाऱ्या उन्हाळ्यात जनतेचे अतोनात हाल होणार आहेत. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाही तर तालुक्यात पाण्यासाठी हाहाकार माजणार आहे.