बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
औंध विभागातील जायगाव केंद्र समूहाचा बालआनंद मेळावा कोकराळे येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.या प्रसंगी केंद्रप्रमुख श्री.प्रताप पाटोळे,सरपंच भिमराव मदने,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हर्षदा सावंत, यात्रा कमिटी अध्यक्ष अविनाश सावंत, ग्रामपंचायत सदस्य किरण सावंत, व्यवस्थापन उपाध्यक्ष रेणुका सावंत व मुख्याध्यापिका सुनिता रणनवरे आदी.उपस्थित होते.
बालआनंद मेळाव्यात लिंबूचमचा शर्यत, फुगा फोडणे,बादलीत चेंडू बसविणे व संगीत खुर्ची आदी फनी गेम्स घेण्यात आले आणि सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.तसेच दुपारी सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले. मेळाव्यास 11 शाळांमधील 400 विद्यार्थ्यी व 35 शिक्षक सहभागी झाले होते. या वेळी गटशिक्षण अधिकारी सोनाली विभुते विस्तार अधिकारी संगीता गायकवाड , सुतार साहेब केंद्रप्रमुख नितिन खोत व संजय दिडके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छां दिल्या.
कार्यक्रमास अनिल साळुंखे,राजाराम मदने,धनाजी चव्हाण, दीपक मोरे,गिरी मॅडम, गुजर मॅडम, राजेंद्र लंभाते, प्रकाश देशमुख, वाडेकर मॅडम, देशमुख मॅडम, फरास सर ,गुजरे सर आदींची उपस्थिती होती.सूत्रसंचालन राजेंद्र बागल यांनी तर स्वागत व आभार दीपक गिरी यांनी मानले.





Social Plugin