Ticker

6/recent/ticker-posts

श्री हनुमानगिरी हायस्कूलला माजी विद्यार्थ्याकडून साऊंड सिस्टिम भेट



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

 सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल शाळेस रणसिंगवाडी तालुका खटाव येथील माजी विद्यार्थी  अजित रणसिंग यांनी त्यांचा चिरंजीव रुद्रप्रताप याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मल्टीपर्पज साउंड सिस्टीम भेट देत संस्काराचे दर्शन घडवले.

  शाळेचे प्राचार्य  डी. एन. गोफने, पर्यवेक्षक  आर. एन.जाधव व शिक्षकांनी भेटवस्तूचा स्वीकार केला. पर्यवेक्षक  आर.एन.जाधव  यांनी शाळेत शिक्षण व संस्कार या गोष्टी शिकवल्या जातात. यामुळे विद्यार्थी शाळेस विसरत नाहीत.असे विचार मांडले.श्री गोफने सरांनी संस्था विविध उपक्रम राबवत असून यातुन शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात असून जिल्ह्यात नावाजलेली शाळा आहे असे विचार मांडले.संस्था अध्यक्ष डॉ.  सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष  बाळासाहेब जाधव,सचिव  मोहनराव जाधव ,तसेच सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी  व संस्था विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प पदाधिकारी यांनी  अजित रणसिंग यांचे आभार मानले. एस. जी. जाधव यांनी आभारमानले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास पोलीस पाटील सुनील रणसिंग, शिक्षक विद्यार्थी, सहकारी उपस्थित होते