Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक सेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी कल्याण पवार यांची नियुक्ती



डॉ.यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर   

            छत्रपती संभाजी नगरचे  शिक्षक सेना जिल्हा संपर्कप्रमुख पदी  मा.कल्याण पवार यांची राज्य शाखेतर्फे नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद, वैजापूर-गंगापूरचे कार्यसम्राट आमदार मा. रमेश जी बोरनारे  व कन्नड सोयगाव च्या संवेदनशील  व कार्यतत्पर आमदार श्रीमती संजना जाधव यांनी सार्थ निवडीबद्दल  अभिनंदन करत पुढील संघटनात्मक वाटचालीस सदिच्छा दिल्या. 

तसेच जिल्हा सरचिटणीस पदी भगवान हिवाळे, मराठवाडा उपाध्यक्ष पदी अनिल काळे,जिल्हा उपाध्यक्ष पदी विनोद मोरे,जिल्हा सचिव पदी अमृत सोमवंशी, जिल्हा संघटक पदी प्रकाश सोनवणे यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस दिपक पवार , राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जगदाळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश लबडे, तसेच जिल्हा शाखेचे पदाधिकारी व जिल्हाभरातील शिक्षक सेना बांधव उपस्थित होते.