Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार हमी योजना अनुदानासाठी हातनूर च्या शेतकऱ्यांचे आमरण उपोषण



  डॉ. यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर

 कन्नड तालुक्यातील  हातनूर येथील शेतकऱ्यांनी मोहगुणी वृक्ष लागवड ही  एमआरजीएस रोजगार हमी योजने अंतर्गत केली होती.परंतु तीन वर्ष उलटूनही आणि पंचायत समिती कार्यालय येथे वारंवार चकरा  मारूनही  पात्र लाभार्थी अनुदान न मिळाल्यामुळे हातनुर येथील शेतकरी यमाजी अकोलकर, अशोक मालोदे, संतोष रोडगे या तिघांनी आज दिनांक 10 मार्चपासून पंचायत समिती कार्यालय कन्नड येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

या वेळी हतनुर येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक अकोलकर ही  हजर होते.याबाबतचे निवेदन त्यांनी गटविकास अधिकारी चंदरहार ढोकणे यांना दिले आहे.