Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड तालुक्यावर शोककळा.. सहा ऊसतोड मजुरांचा करूण अंत..



डॉ.यशवंत पवार @,छत्रपती संभाजीनगर 

काल  रात्री 10: कन्नड- पिशोर रोड वरील गारगोटी(कन्नड) खांडीतील वळणावर उसाच्या ट्रकचा झालेल्या अपघातात उसाखाली दबून सहा युवक ठार झाले तर 9 जखमी झाले.


या अपघातात 

*1.किसन धर्मु राठोड 2. कृष्णा मुलचंद राठोड 3.मिथुन महारू चव्हाण 4.विनोद नामदेव चव्हाण 5.राहुल नामदेव चव्हाण वरील राहणार सर्व भट्टीतांडा कन्नड व 6. ज्ञानेश्वर देविदास चव्हाण बेलखेडातांडा ता.कन्नड* या सहा ऊसतोड मजुरांचा करूण अंत झाला.


         या बाबतीत असे कळते की ,भट्टी तांडा(सातकुंड) येथील 17 गरीब ऊसतोड मजुर ऊसतोडीचे थळ बंद झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातच बसून कन्नडकडे येत होते. 

   गारगोटी खांडीत चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने खाडीतील तीव्र वळणावर ऊस ट्रक पलटी झाला. उसाच्या ट्रक मध्येच बसून घरी येणारे ऊसतोड मजूर दगडी कपार व उसाच्या ट्रकखाली दबले गेले. कन्नड शहरापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या अपघातात उसाच्या ट्रक खाली 17 जण दाबले असताना सुद्धा लोकप्रतिनिधी अथवा  प्रशासनाची वेळेवर मदत मिळाली नाही.जवळपास दोन तास  ऊसतोड कामगार दबलेल्या अवस्थेत असतांनाही प्रशासनाने साधा क्रेन उपलब्ध करून दिला नाही.अखेर नागरिकांनी धाव घेत उसाचा ढिगारा उपसुन ट्रकखालील मजुरांना बाहेर काढले .

   अपघात एवढा भीषण होता की जागेवरच पाच जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी दोन नर्स शिवाय कुठलाही डॉक्टर उपलब्ध नव्हता. दरम्यान जखमी पैकी अजुन एकाचा दुर्दैवी अंत झाला.विषेश म्हणजे ग्रामीण रुग्णालयापासून शंभर फुटावर उपजिल्हाधिकारी गोरड यांचे कार्यालय आहे. परंतु अधिकाऱ्यांनी बाजुच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतांची व नातेवाईकांची भेटी घेतली नाही.


ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार व प्रशासनाचा मठ्ठपणा याने संताप अनावर झालेल्या नातेवाईक व परीसरातील नागरिकांत रोष वाढून तणाव निर्माण होत आहे हे लक्षात येताच तहसीलदार विद्याचरण कडवकर व गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी अंत्यविधीच्या ठिकाणी भेट दिली.

या अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या सहाजणा पैक पाच मजुरांवर भट्टीतांडा(सातकुंड) येथे तर एकावर बेलखेडा तांडा येथे  दुपारी दोन वाजता हजारो नागरीकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करून अखेरचा निरोप देण्यात आला.