प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यातील करमाव तांडचात मोठ्चा प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचा आरोप करत करगाव तांडयातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. दारूबंदी झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे तालुका उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामीण पोलीसांकडे केला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील तिनही तांडधांमध्ये मोठ्चा प्रमाणावर दारू विक्री होत असल्याची महिलांची तक्रार आहे. येथील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर १५ मार्च रोजी धडक दिली. संतप्त महिलांनी उत्पादन शुल्क निरीक्षकांना निवेदन देत गावात तात्काळ दारूबंदी लागू करण्याची मागणी केली. दारूमुळे गावात भांडगे वाढत असून तरुणाई व्यसनाधीन होत असल्याचे महिलांनी म्हटले आहे. दारूबंदी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महिलांनी दिला आहे. या निवेदनावर महिलांच्या सह्या आहेत.





Social Plugin