गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
अवलिया महाराज संस्थान काळामाथा ता. मालेगाव येथे बंजारा होळी महोत्सव लेंगीनृत्य, लोकगीत सांस्कृतीक साहित्य संम्मेलन अखिल भारतीय तांडा सुधार समिती व बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला असता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महोत्सवाचे रामसिंगजी जाधव यांनी महोत्सवाचे उदघाटन केले. मा विलास रामावत महाराष्ट्र प्रदेश सेवादळ अध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी आमदार अमीत झनक व प्रमुख पाहुणे म्हणुन जयकिसन राठोड माजी सभापती, स्वागताध्यक्ष दिलिपराव जाधव माजी अध्यक्ष जि.प. वाशिम, सामाजिक नेते हिरासिंग राठोड कासारखेड, उत्मरावजी राठोड उपाध्यक्ष काळा माता संस्थान, महंत रायसिंगजी महाराज, दिनेश राठोड, साहित्यिक प्राचार्य जे. डी. जाधव पातूर, बंजारा कवी प्राचार्य व्ही. डी. राठोड, राष्ट्रीय किर्तनकार पंकजपाल महाराज, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य टी. व्ही. राठोड, थोर साहित्यिक प्रा. विजय जाधव सर वाशिम, सुरेशभाऊ राठोड वाशिम, इंजि. बबनभाऊ राठोड वाशिम, संस्थानिक जाधव, प्रा. प्रकाशभाऊ वाशिम, सामाजिक सौ. लताबाई भाऊराव राठोड कार्यकर्त्या राठोड अकोला, सौ. सिमाबाई राठोड, विजय राठोड मा. केंद्रप्रमुख, प्राचार्य भरत राठोड पाहुण्यांची विचार पिठावर उपस्थीती होती. या महात्सवामध्ये सामाजिक, राजकिय व इतर क्षेत्रात काम करणा-या समाज बांधवांना/भगिनींना महानायक वसंतरावजी नाईक समाजरत्न पुरस्कार मा आमदार अमित झनक यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले. यावेळी प्राचार्य जे डी जाधव लिखित' आमची माती.. आमची माणसं. 'या पुस्तकाचे लोकार्पण संपन्न झाले. या होळी महोत्सवामध्ये विविध ठिकाणाहुन आलेल्या पुरूष व महीला लेंगी मंडळ यांनी बहुसंख्येने सहभाग नोंदविलाव मंडळाने दिलेल्या विषयावर डफाच्या तालावर लेंगी गीत गावुन सामुहिक लेंगीनृत्य सादर केले यावेळी प्राध्यापक दिलीप चव्हाण यांना अखिल भारतीय तांडा सुधार समितीतर्फे समाज रत्न पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे संचालन रमेश चव्हाण सुदी व प्रा. दिलिप चव्हाण यांनी केले. होळी महोत्सव यशस्वीते करिता आयोजक मंडळ तसेच समाजसेवक श्रावण जाधव व त्यांचे संपुर्ण सहकारी मित्र मंडळीने परीश्रम घेतले.





Social Plugin