गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
सविस्तर असे की शेतकरी एल्गार समिती वाशिम जिल्ह्याचे वतीने दिनांक 03.03.2025 रोजी 03.30 वाजता शेतकऱ्यांच्या 10 मागण्या मंजूर होण्याकरिता उपभागीय अधिकारी कारंजा यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना स्मरण करून देण्याकरिता पुन्हा निवेदन सादर करण्यात आले आहे. येत्या 10 तारखेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर 17.03.2025 रोजी तहसील कार्यालय कारंजा समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलन करूनही मागण्या मान्य केल्या नाही तर महामार्ग अडवून रस्ता रोको आंदोलन करण्याचे शेतकरी एल्गार समिती वाशिम यांच्या कडुन नियोजन करण्यात येणार आहे.





Social Plugin