Ticker

6/recent/ticker-posts

देवचंद कावळे यांनी उपोषण स्थळी जाऊन घेतली उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट.



शैलेश कवळे : लाखांदूर प्रतिनिधी  :

             

               भंडारा - गडचिरोली समृध्दी माहामार्गाला विरोध करुन लाखांदूर तालुक्यातील शेतकरी यांनी कंराडला येथे भानारकर यांच्या घराजवळ दिनांक 2 मार्च 2025 पासुन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

   भंडारा - गडचिरोली समृध्दी माहामार्ग जात असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान होत आहे.काहि शेतकरी तर भुमिहीन होन्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने लाखांदूर येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.कि ज्या शेतकऱ्यांची शेती समृध्दी महामार्गात जात आहे अशा शेतकऱ्यांना 1 कोटी 30 रु एकळि रक्कम द्यावे, परिवारातील एका वेक्तिला शासकीय नौकरी द्यावे व त्या शेतकऱ्याला 30 रु.मासिक पेन्शन देण्यात यावे म्हणून निवेदन दिले.परंतु दिलेल्या निवेदनाची दखल शासनाने अजुनपर्यंत घेतली नाही.म्हणुन दिनांक 2 मार्च 2025 पासुन शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद ठोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक शेतकरी यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली.

   शेतकऱ्यांची बाजू येकुन व शेतकऱ्यांवर हा अन्याय होत आहे.शासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे.कोणत्याहि शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मागण्या  मान्य करावे म्हणुन या शेतकऱ्यांच्या उपोषणाला अखिल भारतीय रोजगार हमी कामगार वेलफेअर संघटनेचे महाराष्ट्र संघटक देवचंद कावळे यांनी पुर्ण पाठिंबा दिला म्हणून उपोषण स्थळी जाऊन भेट दिली.