बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा येथील निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील हे किल्ले वर्धनगड येथे रविवार दि.23 मार्च 2025 रोजी दुर्ग भटकंती साठी किल्ले वर्धनगडावर आले असताना त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे गडावर खाली येऊ शकत न०हते . यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी स्टेचरवरून गडावरुण सुखरूप खाली आणले . निवासी उपजिल्हाधिकारी सातारा .नागेश पाटील हे किल्ले वर्धनगड येथे दुर्ग भटंकतीसाठी आले होते. गडावरून खाली येत असताना त्यांच्या पायास तीव्र अशी दुखापत झाली. त्यांना चालणे असाह्य झाले.,
अशा गंभीर परिस्थितीत वर्धनगड गावचे पोलीस पाटील गणेश जठार यांनी शिवजयंती उत्सव समितीस संपर्क साधला असता तात्काळ संजय घोरपडे यांना फोन करून ट्रेचर घेऊन येण्यास सांगितले.त्यावेळी वर्धनगडचे तलाठी .तुकाराम पाटील यांनी प्रशासनास फोन करून अॅबुलंन्स उपलब्ध करून घेतली..
वर्धनगडमधील तरुण मावळे अक्षय अनपट,रोहन पाचांगणे,उमेश मोरे,सौरभ फडतरे,शुभम घोरपडे,पोलिस पाटील गणेश जठार यांनी वर्धनगड किल्यावरती रेस्कु ऑपरेशन राबवले व निवासी जिल्हाधिकारी साहेबांना खाली आणण्यास मदत केली.
श्रीमंत संताजी घोरपडे प्रतिष्ठाण यांचेकडून शिवजयंती उत्सव समितीस सन २०२४ रोजी स्ट्रेचर दिले होते.,त्याचा आज चांगला उपयोग झाला.. निवासी जिल्हाधिकारी यांनी या युवकांचे धाडसाबट्दल अभिनंदन करून आभार मानले .





Social Plugin